दिंडोशी भाजपात इनकमिंग जोरात

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

दिंडोशी - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरात सुरूये. दिंडोशीतील समाजसेविका अर्चना देसाई यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. मालाड पूर्वेकडील मंत्री पार्क इथं रविवारी आयोजित जाहिर सभेत देसाई यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या वेळी आमदार अमित साटम, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मोहित कंबोज, दिंडोशी विधानसभा अध्यक्ष राजन सिंह आणि भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येनं उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या