शिवसेना-भाजपाला समर्थन नाही - रईस शेख

मुंबई - समाजवादी पक्षाचे जेष्ठ नगरसेवक रईस शेख यांनी स्पष्ट केले की शिवसेना आणि भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजवादी पक्ष समर्थन करणार नाही. मुंबईच्या समस्येसाठी जे जबाबदार आहेत असे दोन्ही पक्ष सध्या सत्तेसाठी भांडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपा आणि शिवसेना यांना साथ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केली. मुंबईत सध्या समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक आहेत. समाजवादी पक्षाच्या या भूमिकेमुळे आता शिवसेनाला मॅजिक फिगर गाठण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल.

पुढील बातमी
इतर बातम्या