सरकारी कार्यालयातील धार्मिक कार्यक्रमावर राज्य सरकारची बंदी

मुंबई - राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी ऑफिस, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ या सर्व ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करु नये असे परिपत्रक काढले आहे. कोणत्याही धर्माचे विधी, सण, उत्सव, शासकीय इमारतीवर धार्मिक घोषवाक्य लिहिणे किंवा फोटो लावणे संविधानानुसार चुकीचे असल्याचे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. तसेच शासकीय कार्यालयातील धार्मिक फोटो सन्मानपूर्वक काढावे असा आदेशही या परिपत्रकात देण्यात आला आहे. सेक्युलर मुव्हमेंट, अंनिस या संघटनेनेही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान हिंदू जनजागरण समितीचे प्रवक्ते अरविंद पानसरे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. हिंदूंच्या मतांवर विजयी होऊन हिंदुविरोधी निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या