कोविड विषाणूचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 (covid-19) या नावाने स्वतंत्र बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलं आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 असा आहे. ज्या कुणाला कोविडसाठी मदत करायची आहे, त्या व्यक्तींना या खात्यात थेट निधी जमा करता येईल.
सढळ हाताने मदत करा
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 (cm relief fund) या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं आहे.
खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येईल.
याचप्रमाणे ज्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीत रक्कम जमा करायची असेल, त्यांना PM CARES Fund याखात्यात पैसेजमा करता येतील.
Name of the Account : PM CARES
Account Number : 2121PM20202
IFSC Code : SBIN0000691
SWIFT Code : SBININBB104
Name of Bank & Branch : State Bank of India, New Delhi Main Branch
UPI ID : pmcares@sbi
असा याखात्याचा तपशील असून यावर देखीलआयकरात सवलत मिळेल.