समाजवादी एकजूटता संमेलन 21 ऑक्टोबरपासून

आझाद मैदान - देशातील खाजगीकरण आणि उदारीकरणाविरोधात लढण्यासाठी समाजवादी विचारांच्या संघटनांनी राष्ट्रीय समाजवादी एकजूटता संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संंमेलन 21 आणि 22 ऑक्टोबरला परळ येथील दामोदर हॉल येथे होणार आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मेधा पाटकर यांनी ही माहिती दिली. यावेळी 'हम समाजवादी संस्थाएं' संगठनेचे जी. जी. परिख आणि मधु मोहिते उपस्थित होते.

"देशभरातील आर्थिक विषमतेचे वाढते प्रमाण, कॉर्पोरेटायझेशन, संघटीत व असंघटीत कामगारांचे प्रश्न, अल्पसंख्याक व दलितांवरील अन्याय, अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. या शोषित वर्गाच्या मूलभूत प्रश्नांवर वेगळा मार्ग, धोरणे तसेच विकासाचे पर्याय शोधणे गरजेचे आहे", असे मेधा पाटकर यावेळी म्हणाल्या. यासाठी लोकशाही समाजवादावर विश्वास असणाऱ्या कार्यकार्त्यांना या संमेलनात मार्गदर्शन करण्यात येणार असून यावेळी कृती कार्यक्रम घोषित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या