अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

दहिसर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून दहिसर विधानसभेतून शाखांना भेटी देण्याचा दौरा सुरू केलाय. त्यांनी पहिली भेट दहिसरमधील शाखा क्रमांक 6 नंतर 1, 2, 3, 8 ,10 देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र या शाखांमधील अंतर्गत वाद जैसे थेच आहे. माजी विभागप्रमुख विनोद घोसाळकर आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम या दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. घोसाळकर यांना कोणत्या कार्यक्रमला बोलवायचे नाही, त्यांचे फोटो छापायचे नाही असा अघोषित आदेश कदम यांच्याकडून देण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यात अनेक पदाधिकारी पद टिकवण्यासाठी कदम यांच्या चमूत प्रवेश केलाय. त्यात शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ जुना वाद तर अजूनही शमलेला नाही. त्याही अनेक स्थानिक कार्यक्रमांना कदम यांना आमंत्रित करतात. त्यात विभागप्रमुख प्रकाश कारकर यांची तब्येत बरी नसल्यानं विलास पोतनीस यांना प्रभारी बनवण्यात आलं. त्यामुळं सध्या घोसाळकर विरोधात कदम असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळं येत्या महापालिका निवडणुकीत शाखेतील अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसणार हे मात्र नक्की. 'पक्षप्रमुखांनी शाखांना भेटी देताना अंतर्गत वादाकडे देखील लक्ष देऊन वरिष्ठांचे कान टोचावे', अशी प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या