राजकीय नेत्यांसह बॉलिवूड विश्वातून भ्याड हल्याचा निषेध

जम्मू-काश्मिरमधील पुलवामा इथं दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवानांना वीरमरण आले. जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. राजकीय नेत्यांसह बॉलिवूडमधूनही या हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्याचे चोख प्रतिउत्तर देण्याची भावना अनेकांनी सोशल मिडियावर व्यक्त केली आहे.

मुंबईत विविध ठिकाणी श्रद्धांजली

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्करांच्या वाहनांवर तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या टेम्पोद्वारे हल्ला केला. या हल्यात जवानांच्या मृत्यूचा आकडा हा 46 वर पोहचला आहे. या भ्याड हल्लाचे तीव्र पडसाद आता देशभर उमटत आहेत. मुंबईतही ठिकठिकाणी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अनेक राजकिय नेते, कलाकारांनी सोशल मीडियावर जवानांना आदरांजली अर्पण केली.

सोशल मिडियावर नेत्यांसह कलाकारांच्या प्रतिक्रिया

या हल्ल्याबाबत राज ठाकरे ट्विटर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांनी ही शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही व्यक्त केला शोक

यासह अक्षय कुमारनं म्हटले आहे की, 'ही घटना कधीही न विसरण्यासारखी आहे. वीर जवानांच्या आत्म्याला शांती लाभो. जखमी जवान लवकर बरे व्हावे, हीच प्रार्थना'. तर प्रियांका चोप्राने ट्विट केलं आहे की, 'हा अतिशय मोठा धक्का आहे. तिरस्कार हे कधीच उत्तर होऊ शकत नाही. जवानांना आदरांजली'. तसंच अभिषेक बच्चननं 'भयानक हल्ला. आज सर्वजण एकीकडे प्रेम व्यक्त करत असताना दुसरीकडे तिरस्कारानं डोकं वर काढलं. जवानांच्या परिवारासाठी प्रार्थना'. त्याचबरोबर अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, सलमान खान, आमीर खानकरण जोहर, आर माधवन, विकी कौशल, स्वरा भास्कर, अर्जून कपूर, मोहित चव्हान, गुल पनाग, रितेश देशमुख, डायना पेन्टी या कलाकारांनीही ट्विटरद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या