“ठाकरे बंधू एकत्र आले तरी परिणाम शून्य”: अमित साटम

शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे एकत्र आले तरी त्याचा मुंबईकरांवर काहीही परिणाम होणार नाही. महायुतीतूनच महापौर निवडून येणार, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमेत साटम यांनी बुधवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात जोरदार विधान केले.

गेल्या काही महिन्यांतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या परिवारातील भेटी आणि डिनर हे केवळ दिखावा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

साटम म्हणाले, “ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. ते घरी गणपतीचे दर्शन, दीपोत्सव, भाऊबीज आणि इतर समारंभांना एकत्र आले तरी मुंबईकरांचा त्याच्याशी काय संबंध? मुंबईकरांना चांगले पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते, रुग्णालये, शाळा, उद्याने, खेळाची मैदाने कोण देणार आणि कसे देणार? हे महत्त्वाचे आहे.”

“ठाकरे यांनी 25 वर्षांच्या सत्ताकाळात मुंबईकरांसाठी कोणते प्रकल्प राबवले आणि कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले? नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे ते सध्या एकत्र येत आहेत. पण पुढील वर्षी गणेशोत्सव, दीपोत्सव आणि भाऊबीजेसाठीही हे ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, याची मी खात्री देतो,” असा दावा साटम यांनी केला.

महायुती एकत्र लढणार

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राकांपा (अजित पवार गट) हे ब्रृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. जागावाटपाच्या चर्चा लवकरच सुरू होतील आणि त्यात कोणताही अडथळा नाही, असेही साटम यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले,

“आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. मात्र राष्ट्रहिताचा विरोध करणारे, ‘वंदे मातरम’ला विरोध करणारे आणि दहशतवादी घटनांना पाठिंबा देणारे किंवा त्यात सहभागी असणाऱ्यांच्या आम्ही ठाम विरोधात आहोत.”

पुढील बातमी
इतर बातम्या