काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी

सीएसटी - आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय नुकताच मुंबई काँग्रेसने घेतला आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेस शहर कार्यालयात गर्दी केली. 28 ऑक्टोबर पासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज देण्यास काँग्रेस कार्यालयात सुरुवात झाली, ती अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत इच्छुक उमेदवारांचे 1500 अर्जांची काँग्रेस कार्यालयातुन विक्री झाली आहे.

त्यामुळे आता या 1500 जणांच्या इच्छुक उमेदवारातून कोणाची उमेदवार म्हणून वर्णी लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उमेदवारी मिळण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे आपली वर्णी लावत आहे . महापालिकेवर अधिक उमेदवार निवडून देण्याचे काँग्रेसचे स्वप्न असले तरी उमेदवारी देताना काँग्रेस मधील वरिष्ठांना अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या