"पवारांचा राजकीय वारसदार काळच ठरवेल"

मुंबई - खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा राजकीय वारसदार नक्की कोण असेल, हे आताच सांगता येणार नाही. ते काळच ठरवेल, असं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या