परवडणारी घरं ही सरकारची चलाखी - उद्धव ठाकरे

कुलाबा - परवडणारी घरं ही सरकारची शाब्दिक चलाखी आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली. जलसाक्षरता परदेशात आहे, मात्र इथे पाणी असूनही वेगळी परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

रेसकोर्स मुंबईबाहेर नेऊन ती जागा सर्वसामान्य नागरिकांना मैदानासाठी मोकळी करावी. त्याचबरोबर पूर्व उपनगरांतली खारजमीन सर्वसामान्याना मोकळी करून देण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. कुलाबा येथील मलनिःसारण प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत कुलाबा मलजल प्रक्रिया क्रेंद्राचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी झालं, तेव्हा ते बोलत होते. या वेळी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं. नोटांचा तुटवडा भासतो मात्र महापालिकेच्या नियोजनबद्ध कामामुळे मुंबईकरांना पाण्याचा तुटवडा भासत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महापौर स्नेहल आंबेकर, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई,  महापालिका आयुक्त अजॉय मेहता आदीही या वेळी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या