'लाचार होऊन युती करणार नाही'

वांद्रे -  लाचार होऊन युती होणार नाही. योग्यवेळी निर्णय घेऊ  असं उद्धव ठाकरे यांनी रंगशारदामध्ये भाजपाला ठणकावून सांगितले. तसेच मला बोलू न देणारा जन्माला यायचा आहे असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. 

नोटाबंदी, हिंदुत्व यासारख्या अनेक मुद्द्यांना हात घालत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला डिवचलं. निवडणुका होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नका या मागणीसाठी शिवसेना खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

मुंबई महानगरपालिका निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर आलीय. त्यातच भाजपा शिवसेनेमधील वाद अधिक उफाळून आलाय. आता या वादात ठिणगी पडलीय उद्धव ठाकरेंच्या रंगशारदा मधील भाषणाची. त्यामुळे आता या वाद-विवादाचे अजून किती अंक महाराष्ट्रातील जनतेला पाहावे लागतायेत हे पाहण औत्सुक्याचं ठरेल.

पुढील बातमी
इतर बातम्या