Maharashtra Political Saga: हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंचे आवाहन

(File Image)
(File Image)

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या चिन्हाबरोबरच विधानसभा निवडणुका घेऊन दाखवा असे थेट आवाहनच त्यांनी बंडखोर आमदारांच्या गटाला दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, मी आजही म्हणतोय की हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मध्यावधी व्हायला हवी, चुकलो असेल तर जनता घरी बसवेल.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली? जी गोष्ट दिलदारपणे व्हायला पाहिजे, ती अशी लपवून का केली? विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे. जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असेल. तुमचा आनंद तुम्हाला लखलाभ असो. त्यांच्या डोळ्यातले अश्रूचे मोल मला जास्त आहेत. हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेला दृष्टीहीन महाराष्ट्र आहे. जनतेला एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय. शिवसेनेनं एवढं मोठं पद दिल्यावरही अशी माणसं का वागत आहेत, याचं उत्तर द्यावं लागेल. सर्वसामान्य जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यासोबतच धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेचेच असणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 'धनुष्य बाण' हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले की, शिवसेना विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

11 जुलैच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. कोर्टाच्या निकालाची चिंता नाही. न्यायालय योग्य निर्णय देईल याचा विश्वास आहे. हा निकाल देशाला दिशा देणारा असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा

किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट, शिंदे-भाजपमधील वाद उघड

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेचे 66 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात

पुढील बातमी
इतर बातम्या