आपल्या घरात राहून कोणीही शेर असतो - उद्धव ठाकरे

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

दिंडोशी - आपल्या घरात राहून कोणीही शेर असतो. सीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते का? जवानांचं श्रेय तुम्ही लाटता. एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा या मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. दिंडोशी कुरार येथील वीर सावरकर मैदानातील जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.

आकाशातून आमचे पंतप्रधान येणार आणि बटण दाबून जाणार, बटण दाबली ती सर्व कामं रखडली. गिरगावमध्ये मेट्रोसाठी बटण दाबलं तिथे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. आरेमध्ये जर कारशेड झाले तर पुरसदृश परिस्थिती होईल. महापालिका आपल्या ताकदीवर कोस्टल रोड बांधेल. मोदी फक्त थापा मारतात, आमची अवलाद थापा मारायची नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली. आम्ही मुंबईत विकासकामं करून दाखवली, जल शुद्धीकरण योजना ही महापालिकेची आहे, कोणत्या अँगलने मुंबई तुम्हाला पाटण्यासारखी दिसली, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

तुम्ही काय केलं, तर मुंबईत वायफाय. पथकर हा मालमत्ता करामध्ये येतो, मी तर पूर्ण 500 चौ. फुट कर रद्द करतो अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपाच्या जाहीरनाम्यावरही ताशेरे ओढले. या निवडणुकीत कोणी प्रतिस्पर्धक नाही आहे. 125च्या वर जागा शिवसेना जिंकेल आणि एकहाती सत्ता स्थापन करू असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुढील बातमी
इतर बातम्या