अभिजित चव्हाण यांना टाय टाय फिश

मुलुंड - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे. त्यामुळे ‘कही ख़ुशी कही गम’ अशी परिस्थिती आहे. मुलुंड येथील वॉर्ड क्रमांक 105 महिलांसाठी आरक्षित झाला. यामुळे इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नंदकुमार वैती यांना पुन्हा याच वॉर्डमधून निवडणूक लढवता येणार नव्हती. तर दुसरीकडे आरक्षण जाहीर होण्याआधीच वॉर्ड 106 मध्ये अभिजित चव्हाण यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. अभिजित चव्हाण यांनी 'अभिजित प्रातिष्ठान' या त्यांच्याच संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे यांनाच उमेदवारी मिळू शकेल अशी दाट शक्यता होती. आरक्षण सोडतीत वॉर्ड 106 खुला प्रवर्गासाठी जाहीर झाला. त्यामुळे वॉर्ड 105 मधील नगरसेवक वैती यांनी आपला मोर्चा वॉर्ड 106 कडे वळवला आणि पक्षानेही अभिजित चव्हाण यांना डावलून वैती यांनाच उमेदवारी घोषित केली.

अभिजित चव्हाण हे पालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आहेत. "पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मला पक्षाने अन्य वॉर्ड संदर्भात उमेदवारीसाठी विचारणा केली होती परंतु मी नकार दिला," अशी माहिती अभिजित चव्हाण यांनी दिली आहे. असे असले तरी या पुढच्या काळात अभिजित चव्हाण हे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या