‘मुंबईची वाट लावली टायगरने’, शिवसेनेची खिल्ली उडवली भाजपाने

दादर - मुंबई महापालिकेत रस्ते आणि नालेसफाई घोटाळे उघडकीस आले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी महापालिका कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले, परंतु या दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी वाघानेच मदत केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावरून भाजपाच्या फेसबुक या अकाउंटवरून अपलोड केला आहे. त्यामुळे या अॅनिमेटेड व्हीडिओतून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

या व्हीडिओमध्ये महापालिकेतील घोटाळेबाज कंत्रादार आणि अधिकाऱ्यांना पोलीस कोठडीत डांबण्यात आल्याचे दाखवले आहे. पण त्या कोठडीच्या बाहेर वाघ घुटमळत असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर हाच वाघ चावी आणून कोठडीला लावलेले टाळे उघडून त्यांची सुटका करतात. त्यानंतर वाघ बाहेर उभा राहतो आणि अटकेतील अधिकारी आणि कंत्राटदार यांना सहीसलामत जाऊ देतात, असं दाखवले आहे. त्यानंतर एक टॅगलाईन येते "मुंबईची वाट लावली टायगरने". त्यामुळे एकप्रकारे महापालिकेत जे रस्ते आणि नालेसफाई घोटाळे उघडकीस आलेत, त्याला वाघोबा अर्थात शिवसेना जबाबदार असून या घोटाळेबाजांना शिवसेनाच पाठीशी घालत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मिडियातही शिवसेना -भाजपात चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या