मुंबईत घर पाहिजे? मग शाकाहारी व्हा !

तुम्हाला मुंबईत घर घ्यायचंय ? पण तुम्ही मांसाहारी आहात ? मग तुम्हाला घर घेणं अवघडच होणार आहे. कारण मांसाहारी ग्राहकांना घर विकायचे नसल्याची भूमिका अनेक बिल्डरांकडून घेतली जातेय. अशाच एका बिल्डरनं नगरसेवक संतोष धुरी यांना मांसाहारी असल्यानं गोरेगावमधल्या प्रकल्पात घर देण्यास नकार दिलाय. याआधीही बिल्डरकडून मांसाहारी असल्यानं घर नाकारल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा बिल्डरांविरोधात कारवाईही करण्यात आली आहे. पण या कारवाईनंतरही बिल्डरांची मनमानी सुरूच आहे. 

 श्रीधन बिल्डरकडून गोरेगावमधल्या त्यांच्या प्रकल्पात मांसाहारी ग्राहकांना घरे नाकारली जात असल्याची माहिती धुरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ग्राहक म्हणून श्रीधन बिल्डरशी संपर्क साधला. जर तुम्ही शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट विकण्यात येईल, असं सांगितलं. त्यामुळे धुरी यांनी दादर पोलीस ठाण्यात बिल्डरविरोधात तक्रार दाखल केलीय. तसंच याप्रकरणी लवकर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा धुरी यांनी दिलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या