दहिसर - संतोष पांडे यांची भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मागाठणे विधानसभा मतदारसंघात संतोष पांडे यांचं अभिनंदन करण्यासाठी दहिसरच्या रावलपाडा विश्वकर्मा शाळेत कार्यक्रम झाला. संतोष पांडे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
या कार्यक्रमाला भाजपाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत पांडे, निशाद कोरा, जनार्दन तिहाडी, लालचंद यादव, विद्यासागर दीक्षित, सुरेश विशवकर्मा, कमलावेन राजपुरोहित, अभिषेक पांडे, चित्रपट कलाकार अनिल उपाध्याय, सुशील गुप्ता आदी उपस्थित होते.