शिंदे गटाला मनसेत विलीनीकरण करायचे असल्यास स्वागत आहे : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे गटाला त्यांच्या आमदारांसह मनसेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे सांगितले.

एकनाथ शिंदे गटाचे 40 आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील होणार असल्याचे प्रसारमाध्यमातून ऐकू आले. परंतु प्रत्यक्षात तसा प्रस्ताव आमच्यापर्यंत पोहोचला नाही, मात्र तसा प्रस्ताव आल्यास मी त्याचा नक्कीच विचार करेन, त्यांचे स्वागत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत हे आमदार मनसेत आल्यास मनसेच्या मूळ कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांशी माझा कोणताही दुजाभाव नाही, मी महाराष्ट्रासाठी हा निर्णय घेईन, असे सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, "मी टोल आंदोलन केले, 65 टोलनाके बंद केले, याचे श्रेय तुम्ही देणार नाही का? सत्तेत आल्यावर मुंबईतील टोल का बंद केला नाही? मनसेने भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर 40 टक्के भोंगे बंद झाले."

संघ किंवा भाजपला पूर्णपणे सत्तेवर येण्यासाठी 1952 ते 2014 पर्यंत प्रवास करावा लागला, प्रत्येक राजकीय पक्ष संघर्ष करत आहे, मला माझ्या वडिलांचा, आजोबांचा, काकांच्या विचारांचा वारसा लाभला आहे, त्याचा मला फायदा होणार आहे, सत्तेसाठी लोकांची विभागणी झाली आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 

जर मी बीएमसीमध्ये सत्तेवर आलो तर असे काम करेन जे मुंबईत पाहिले नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या