कोणत्याच पक्षाला नवीन PADU मशीनची माहिती देण्यात आली नाही - राज ठाकरे

मुंबई (mumbai) महानगरपालिका निवडणुका (bmc elections) अधिक पारदर्शक आणि हायटेक होणार आहेत. निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच एका नवीन उपकरणाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नाव PADU आहे.

PADU चे पूर्ण रूप म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की PADU म्हणजे काय?

हे एक विशेष डिस्प्ले युनिट आहे जे EVM मशीनला जोडले जाईल. मतदान केल्यानंतर, मतदाराने कोणाला मतदान केले याची माहिती या स्क्रीनवर स्पष्टपणे प्रदर्शित केली जाईल.

यामुळे मतदानाबद्दलच्या शंका दूर होतील आणि प्रक्रियेत पारदर्शकता येईल. म्हणूनच, जर मतदान केंद्रावर EVM मशीन खराब झाली तर PADU सिस्टम बॅकअप असेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे अत्याधुनिक उपकरण बंगळुरूमधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने तयार केले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी (election) विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदाना अगोदर नवनवीन पायंडे पडत असल्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोंडसूख घेतले.

आज मतदारांना भेटण्यासाठी 5 वाजेपर्यंतचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. ही नवीनच प्रथा आयोगाने आणल्याबाबत ठाकरे यांनी सडकून टीका केली.

तसेच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिटचा (PADU) वापर करण्यात येत असल्याबाबत राज ठाकरे (raj thackeray) यांनी टीकेची झोड उठवली.

तसेच कोणत्याच पक्षाला या नवीन मशीनची माहिती देण्यात आला नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. तर या सर्व प्रकारावर त्यांनी साशंकता उपस्थित केली.

त्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत या पाडू मशीनविषयीची माहिती दिली.

EVM ला हे नवीन पाडू मशीन जोडल्या जाणार आहे. पाडू मशीन म्हणजे Deploy Printing Auxiliary Display Unit-PADU. पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे.

हे यंत्र ईव्हीएम सोबत जोडल्या जाणार आहे. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट या यंत्रणा सोबत जोडण्याचे आदेश आहेत.

कंट्रोल युनिटचा डिस्प्ले जर अचानक बंद झाला तर अशावेळी पाडू मशीन उपयोगात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.


हेही वाचा

महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत बँका बंद

14 ते 16 जानेवारीदरम्यान 'या' मार्गावर प्रवेश बंद

पुढील बातमी
इतर बातम्या