'कास्टलेस देश कधी घडवणार'

दादर - भारतीय लोकसत्ताक संघटना या संस्थेने कॅशलेस देशासाठी प्रयत्न केला कास्टलेस देश कधी घडवणार यासाठी स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार पुढे कार्यान्वित करण्यासाठी आता स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आलीय. फिरती न्यायालये, कास्टलेस समाज, कास्टलेस समाजासाठी शासनाला नियोजन करण्यास भाग पाडणे, नदी जोड प्रकल्प अशा डॉ. आंबेडकरांच्या विचारांना चालना देऊन भारत घडावा अशी अपेक्षा संस्थेने केली आहे. देशामध्ये कॅशलेस बद्दल बोलले जाते मात्र कास्टलेस देशासाठी प्रयत्न केला जात नाही त्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी भारतीय लोकसत्ताक संघटनेचे सरचिटणीस अमोल निकाळजे यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या