वॉर्ड 107 मध्ये भाजपाचे दावेदार कोण?

मुलुंड - वॉर्ड क्रमांक 107 हा महिलांसाठी आरक्षित आहे. यामुळे इथले आताचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना या वॉर्डमधून निवडणूक लढवता येणार नाही. मात्र आता गंगाधरे यांच्या पत्नी या वॉर्डमधून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. अन्य वॉर्डमध्ये मनोज कोटक आणि निल सोमय्या यांच्यासारखे दिग्गज दावेदार असल्याने गंगाधर यांच्यासमोर फार मोठा पेच निर्माण झाला आहे. तरीही 'पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल', अशी सावध भूमिका प्रकाश गंगाधर यांनी व्यक्त केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या