युती झाली, तर शिवसेनेशीच - मुनगंटीवार

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रस्ताव आल्यास युतीबाबत विचार करू असं विधान मंगळवारी केलं. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनसेची युती कुणाशी होणार, शिवसेना-मनसे एकत्र येणार का यावर गरमागरम चर्चा होऊ लागल्या. पण भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र युती शिवसेनेशीच होऊ शकते, असं वक्तव्य केलंय.

सोमवारी भाजपा नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही युतीसाठी अनुकूल असल्याचं सांगण्यात येतंय. पण राज्यात सर्वच ठिकाणी 100 टक्के युती अनेकदा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यातली भेट महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत निर्णायक ठरू शकेल.

पुढील बातमी
इतर बातम्या