मतदानासाठी मुंबईचं हवामानही अनुकूल

मुंबई - गेला महिनाभर सुरू असलेल्या बोचऱ्या थंडीनंतर हवामानातील बदलामुळे मुंबईकरांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी हवामानही अनुकूल असणार आहे. येत्या 24 तासात वातावरणात बदल होतील. गेले आठवडाभर मुंबईकरांना सहन करावी लागणारी उष्णता काही अंशी कमी होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळं मुंबईकरांना मतदानासाठी घराबाहेर पडताना उन्हाचा सामना करावा लागणार नाही.

गेला आठवडाभर जाणवू लागलेल्या उष्णतेचे मुख्य कारण म्हणजे पूर्वेकडून मुंबईकडे येणाऱ्या वाऱ्यांची गती तीव्र झाली होती. त्यामुळे उष्णतेत वाढ झाली होती. मात्र येत्या 2 दिवसांत रत्नागिरी, मुंबई, ठाणे या किनारपट्टीवरील वाढलेल्या तापमानात उतार दिसेल. सध्या तापमान सरासरी 6 डिग्रीपेक्षा जास्त आहे. येत्या 24 तासांत तापमानात घट दिसेल. त्यामुळे उष्णतेची तीव्रता थोडी कमी झाली असेल. गेले आठवडाभर उष्णता होती ती कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या