कामगार संघटनेची जनतेला हाक

प्रभादेवी - महाराष्ट्रातील 35 कामगार संघटनांची रविवारी प्रभादेवीच्या भूपेश गुप्ता भवनमध्ये बैठक झाली. या वेळी सर्व कामगार संघटनांचे 500 हून अधिक सदस्य उपस्थित होते. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक कामागारांना आपली नोकरी गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर 9 मार्चला दुपारी 3 वाजता राणीबाग भायखळा ते काळाचौकी मैदानापर्यंत 10 हजार कामगारांचा महामोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली.

या महामोर्चात समान कामाला समान वेतन, सर्व कंत्राटी कामगारांना सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कायमस्वरुपी काम, कामगार विरोधी कायदे हाणून पाडा, परवडणारी घरे बड्या बिल्डरांकडून नकोत, आम्हाला जागा द्या सहकारी पद्धतीने आम्ही आमची घरे बांधू, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, खासगी वाहनांवर आळा, शिक्षण, आरोग्य आणि बालसंगोपण या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात दुप्पट तरतूद करा या मागण्या या महामोर्चाच्या निमित्ताने सरकारकडे केल्या जाणार आहेत.

या बैठकीचे आयोजन विश्वास उटगी, डॉ. अभय शुक्ला, उल्का महाजन, कॉ. र.ग. कर्णिक, एच. एम.एस.चे जर्नल सेक्रेटरी शंकराव साळवी, सुकुमार दामले यांनी केलं होतं.

पुढील बातमी
इतर बातम्या