१८ किंवा २१ व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही? - आदित्य ठाकरे

मतदान जर १८व्या वर्षी करता येतं, तर मग निवडणूक १८ किंवा २१व्या वर्षी का लढवता येत नाही?' असा एक मूलभूत प्रश्न युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान २५ वर्षाची वयोमर्यादा असते. आता याच मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जास्तीत जास्त तरुण राजकारणात सक्रिय झाले, तर त्यांचा देशातील राजकारणाला नक्कीच फायदा होऊ शकतो. असं मतही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.


हेही वाचा

'नाहीतर विद्यार्थी लाभार्थी असते' आदित्य यांचं ट्विटरवॉर

पुढील बातमी
इतर बातम्या