रस्त्याची दुर्दशा, रहिवासी त्रस्त

सँडहर्स्ट रोड -येथील हाजी मोहम्मद उमेर रस्त्याची दुर्दशा झालीय. काही दिवसांपूर्वी गटाराच्या कामानिमित्त हा रस्ता खोदला गेला होता. नवीन पाइपलाइन टाकली पण डांबरीकरण केले गेले नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले. याचा नाहक त्रास रहिवाशांनी होतोय. यासंदर्भात कंत्राटदार भारत भंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या