सेन्सेक्सची ३३ हजारांवर झेप, गुंतणूकदारांनी कमावले १.४२ लाख कोटी

मुंबई शेअर मार्केटमधील तेजीच्या जोरावर सोमवारी गुंतवणूकदारांनी १.४२ लाख कोटी रुपये कमावले. २७ आॅक्टोबर रोजी बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांची एकूण मार्केट कॅप १ कोटी ४२ लाख ४० हजार ८३२.८३ रुपये होती. त्यात सोमवारी वाढ होऊन मार्केट कॅप १ कोटी ४३ लाख ८२ हजार ६५५ रुपयांवर पोहोचली आहे. त्यानुसार गुंतवणूकदारांनी १ कोटी ४१ लाख ८२२.१७ रुपये कमावले.

सेन्सेक्सची भरारी

ग्लोबल आणि देशांतर्गत मार्केटमधून मिळालेल्या पॉझिटीव्ह संकेतांच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत पहिल्यांदाच ३३,२६६ चा आकडा गाठला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही पहिल्यांदाच १०,३६४ वर झेप घेतली आहे.

कशामुळे वाढ?

केंद्र सरकारच्या 'रिकॅपिटलायझेशन प्लान'मुळे बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये आलेली तेजी आणि क्रूडच्या किमतीतील वाढीमुळे आॅईल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी वाढली. परिणामी सोमवारी सकाळी सेन्सेक्सने १०० अंकाची वाढ नोंदवत व्यवहारांना सुरुवात केली.

बँक निफ्टीत ०.६० टक्के वाढ

फार्मा इंडेक्स सोडून सर्वच सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सनी दिवसअखेर उत्तम कामगिरी केली. खासकरून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी नोंदवली. बँक निफ्टी ०.६० टक्क्यांची वाढ नोंदवून २४९८८.५५ वर पोहोचला.

तर निफ्टी 'पीएसयू' बँक इंडेक्समध्ये १.२२ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. या इंडेक्समधील सर्व १२ बँकांचे शेअर्स वाढले. त्यातही सर्वाधिक वाढ युनियन बँकेच्या शेअर्समध्ये ७.४६ टक्के दिसून आली.

त्याचप्रमाणे निफ्टी आॅटो इंडेक्स ०.९६ टक्के, फार्मा इंडेक्स १.०९ टक्के, रियल्टी इंडेक्स २ टक्के वाढीसह बंद झाले.

१५० हून अधिक शेअर्सचा वर्षभरातला उच्चांक

इमामी लिमिटेड, भारत फोर्ज, बाटा इंडिया, बीपीसीएल, डीसीडब्ल्यू, गेल, टाटा स्टील, टीव्हीएस मोटर्स, मारूती सुझूकी इ. १७९ कंपन्यांच्या शेअर्सनी ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला.

सलग ४ दिवस तेजी

सोमवार

सेन्सेक्स

३३,२६६

निफ्टी

१०,३६४

शुक्रवार

सेन्सेक्स

३३२८६.५१

निफ्टी

१०,३६६.१५

गुरूवार

सेन्सेक्स

३३,१९६.१७

निफ्टी

१०,३५५.६५

बुधवार

सेन्सेक्स

३३,११७.३३

निफ्टी

१०,३४०.५५

पुढील बातमी
इतर बातम्या