सेन्सेक्समध्ये रेकॉर्डब्रेक तेजी, 448 अंकांची उसळी

आंतरराष्ट्रीय बाजारातून अत्यंत सकारात्मक संकेत मिळाल्याने गुरूवारी मुंबई शेअर बाजाराने रेकॉर्डब्रेक तेजी नोंदवली. दिवसअखेर सेन्सेक्सने 448 अंकांची उसळी घेत 30750 अंकांवर मजल मारली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 149 अंकांची वाढ नोंदवून 9510 अंकांवर झेप घेतली. दिवसभरातील व्यवहारांमध्ये बँकिंग इंडेक्स सर्वाधिक तेजीत होते.

व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 30793 वर पोहोचला होता. परंतु दिवसअखेर विक्रीचा जोर वाढल्याने सेन्सेक्सने आघाडी गमावली. यापूर्वी सेन्सेक्सने 17 मे रोजी 30712 चा आजवरचा सर्वोत्तम दर गाठला होता. तर निफ्टीनेही 9500 अंकांच्या वर नोंदणी केल्याने गुंतवणूकदारांमधील उत्साह वाढला आहे.

बँकिंग इंडेक्सनेही दिवसअखेरपर्यंत 2.9 टक्क्यांची वाढ नोंदवत 23191 अंकांवर झेप घेतली आहे. हा बँकिंग इंडेक्सचाही आजपर्यंतचा सर्वोत्तम दर आहे. फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक या बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा जोर होता. परिणामी, या बँकांचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या