शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे, सेन्सेक्स १९३९ ने कोसळला

मागील काही दिवस तेजीत असलेल्या देशातील शेअर बाजारात शुक्रवारी भूकंप झाला. सेन्सेक्स तब्बल १९३९ तर निफ्टी ५६८ अंकांनी कोसळला. हा दिवस शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. या पडझडीत गुंतवणूकदारांचे ५.४३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

शेअर बाजारातील ही घसरण इतकी तीव्र होती की प्रत्येक मिनिटाला गुंतवणूकदारांना १४५० कोटींचा फटका बसला. बॉण्ड यिल्डमध्ये वाढ झाल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भांडवली बाजारातून पैसे काढून घेतील अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आज बाजारात जोरदार विक्री दिसून आली. 

भारतीय शेअर बाजाराची सुरूवात शुक्रवारी प्रचंड पडझडीने झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. सेन्सेक्स तब्बल १२०० अंकांनी तर निफ्टी ३०० अंकानी आपटला.  जागतिक शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे देशातील शेअर बाजारात त्सुनामी आल्याचं दिसून आलं. सकाळी ९.१५ मिनिटाने सेन्सेक्स उघडला ते १ हजार अंकांच्या घसरणीनेच. 

दिवसाअखेरीस सेन्सेक्स ४०,०९९ अंशांवर तर निफ्टी १४,५२९ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील सर्व ३० तर निफ्टीमधील सर्व ५० शेअर्स घसरून बंद झाले.  बँका-वित्तसंस्था, वाहन उद्योग, धातूनिर्मिती व औषधनिर्मिती क्षेत्र, आयटी आदी सर्व क्षेत्रांचे शेअर्स कोसळले. रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो, इन्फोसिस, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या