दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे नेते, ज्येष्ठ विचारवंत, दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक आणि लेखक राजा ढाले यांचं निधन झालं. मंगळवारी सकाळी अल्पशा आजारानं त्यांच्या विक्रोळीतील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

बुधवारी अंत्यसंस्कार

राजा ढाले यांचे पार्थिव विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात नेण्यात आल्याचं समजतं आहे. राजा ढाले यांच्या पार्थिवावर मुंबईत बुधवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा सुरु होईल आणि दादर चैत्यभूमी या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.

दु:खाचं वातावरण

राजा ढाले ढाले यांच्या जाण्यानं आंबेडकरी जनता आणि साहित्यक्षेत्रात दु:ख व्यक्त होत आहे. तसंच, दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीचं मोठं नुकसान झाल्याची भावना, चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यक्षेत्रात व्यक्त होत आहे.


हेही वाचा -

कोस्टल रोडवर प्रकल्पाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली


पुढील बातमी
इतर बातम्या