गेल्या काही वर्षांत परळ ते वरळी या विभागात विकास कामे झपाट्याने झाली आहेत. या विभागात बऱ्याच मिल आणि मिल कामगारांची वसाहत होती. पण काळ बदलला आणि मिल बंद झाल्या, तिथे काम करणारी लोकं आणि त्यांच्या वसाहती काळासोबत ओस पडायला लागल्या.
या मिलसंदर्भात सरकारने कायद्यात बदल केला. आपल्या सोयीनुसार..! आणि म्हणून आज मिलच्या जागी व्यापार केंद्रे किंवा मॉल तयार झाले आहेत. मिल वसाहतीच्या चाळी काही ठिकाणी आहेत तर काही ठिकाणी नाहीत असं चित्र या विभागात बघायला मिळत आहे.
या प्रगत परिसर व्यवस्थापनाकडे(एएलएम) १२ गृहनिर्माण संस्था, ८ कॉर्पोरेट आणि चार प्रमुख मार्ग आहेत. यामध्ये दैनिक शिवनेरी मार्ग, डॉक्टर ई मॉसेज मार्गाचा काही भाग, गणपतराव कदम मार्ग आणि सेनापती बापट मार्गाचा काही भाग येतो. या सर्व विभागाची एकूण लोकसंख्या 60 हजाराच्या घरात जाते
- केशव शेनॉय, सचिव, वरळी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन