'इथं' मिळेल जुन्या कपड्यांच्या बदल्यात गिफ्ट व्हाऊचर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

घरातले जुने कपडे आपण टाकून देतो किंवा घरातल्या कामांसाठी बारदन म्हणून त्याचा वापर करतो. नाहीतर आपली आई जुने कपडे भांडीवालीला द्यायला तयारच असते. राहिला प्रश्न चपलांचा. तर ते जुने झाले की, तुटले की कोपऱ्यात पडून राहतात. कालांतरानं दुर्लक्षित झालेल्या चपला किंवा सँडल आपण टाकून देतो.

पण पुमा कंपनी तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. गुंज फाऊंडेशन सोबत पुमा एक प्रकल्प घेऊन येत आहे. अर्थव्यवस्थेचे चक्र फिरते रहावे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. येत्या २२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

फायद्याची डिल 

आपल्याकडे वापरात नसलेल्या कपड्यांचा आणि बूट, चपलांचा वापर आपण बंद केलेला असतो. घराच्या एका कोपऱ्यात त्या वस्तू धूळ खात पडलेल्या असतात. पण आता याच बिनकामाच्या वस्तू तुमच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहेत. एकप्रकारे पुमा मुंबईकरांना त्यांचे जुने कपडे आणि बूट, चप्पल जवळच्या पुमा स्टोरवर जमा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

काय आहे योजना?

तुमच्या जवळच्या कुठल्याही पुमा स्टोरवर जाऊन जुने कपडे, बूट, चप्पल जमा करावे.  तुमच्या जवळपास कुठे पुमा स्टोर नसेल तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुमची जवळचे पिकअप पॉईंट निवडू शकता. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या वस्तू जमा करू शकता. या बदल्यात पुमाकडून तुम्हाला एक गिफ्ट व्हाऊचर मिळेल. ते दाखवून तुम्ही पुमाच्या वस्तूंवर २०% डिस्काउंट मिळवू शकता

वस्तूचं काय होतं?

तुम्ही पुमाला दिलेले कपडे किंवा चप्पल गुंज फाऊंडेशनकडे जमा करण्यात येईल. गुंज फाऊंडेशन त्यावर प्रक्रिया करून ते वापरण्याजोगे करतील. हे सर्व सामान खेड्यांतील शाळांमध्ये किंवा जिथे नैसर्गिक आपत्ती आहे अशा ठिकाणी देण्यात येतील.

पुमाच्या या संकल्पनेमुळे सामाजिक कार्याला हातभार तर लागणारच आहे. या डीलचा तुम्हालाही फायदा होणार आहे. याशिवाय एका चांगल्या कार्यात तुम्ही सहभागी होत आहात.


पुढील बातमी
इतर बातम्या