टेकफेस्टची धूम २९ डिसेंबरपासून

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

आशिया खंडातील सर्वात मोठा विज्ञान व तंत्रज्ञानाचा उत्सव ‘टेकफेस्ट’ यंदा २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान ‘आयआयटी मुंबई’ येथे सुरू होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शोध- संशोधनाला जगासमोर मांडण्याची संधी ‘टेकफेस्ट’च्या माध्यमातून दरवर्षी मिळत असते. देशातील २ हजार ५०० काॅलेज आणि परदेशातील ५०० शिक्षणसंस्थांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी, तंत्रज्ञ व अभ्यासक टेकफेस्टसाठी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.

यंदाच्या थीमसाठी 'हे' विषय

देशातील सद्यपरिस्थिती आणि जगाशी असलेली स्पर्धा पाहता जैवविविधता, डिजिटायझेशन, सस्टेनबिलीटी या विषयांत आणखी तंत्रज्ञान आणि प्रगती आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या आयआयटी टेकफेस्टच्या यंदाच्या थीमसाठी हे विषय निवडण्यात आले आहेत.

कुणाचं मार्गदर्शन मिळाणार?

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती एच. ई. हमीद करझाई, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर आदी मान्यवर टेकफेस्टमध्ये यंदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई आयआयटी (पवई) येथे आयोजित होणारा हा ‘फेस्ट’पाहण्यासाठी कोणतेही शुल्क असणार नाही. फेस्टमधील प्रवेशासाठी ओळखपत्र पुरेसं असेल. जागतिक पातळीवर गाजलेल्या या फेस्टचं आयोजन मुंबई आयआयटीचे विद्यार्थी गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत.

यंदा जगभरातील भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रदर्शनात भारतीय नौदल आणि लष्करातील उत्तम मशीन्स आणि उपकरणेही येथे ठेवली जाणार आहेत. तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा मेळ नवीन संशोधन आणि विचारांच्या पलिकडच्या प्रदर्शनातून नवीन प्रयोग यंदाच्या आयआयटी टेकफेस्टमध्ये अनुभवायला मिळेल एवढं नक्की.

पुढील बातमी
इतर बातम्या