पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुंबईतील पत्रकारांकडून निषेध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईत बुधवारी पत्रकारांनी प्रेस क्लब ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. काळ्या फिती लावून तसेच हातात मेणबत्ती घेऊन पत्रकारांनी आपला निषेध व्यक्त केला. बंगळुरुतील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील पत्रकारांनी निषेध नोंदवला आहे. गौरी लंकेश या 'लंकेश पत्रिका'च्या संपादक होत्या. त्या फक्त पत्रकारच नव्हत्या, तर एक सामाजिक कार्यकर्त्या देखील होत्या.

मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या बंगळुरू येथील घरात शिरून त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर अजूनही फरार आहेत.

या हत्येचा निषेध नोंदवताना मुंबई प्रेस क्लब आणि मुंबई पत्रकार संघाने या हत्येची तपासणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी केली आहे. लंकेश यांची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्यांनी उजव्या विचारांच्या राजकीय नेत्यांविरुद्ध लिखाण केल्यानेच त्यांची हत्या झाली असवी अशी चर्चा आहे.

हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी केली हत्या

कट कारस्थानातून हा खून झाला. महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी तसेच आता झालेल्या दाभोलकर, कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्या हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी केल्या आहेत. ही पत्रकारितेची हत्या नाही, तर लोकशाहीची हत्या आहे.

- कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार 

या घटनेबद्दल ट्वीटरवरही टीका होत आहे.

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या