कलावर्धिनी भरतनाट्यम स्पर्धा

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

माटुंगा - गेल्या 25 वर्षात कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि दादर माटुंगा सांस्कृतिक कला केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणारी स्व रचनेतील भरतनाट्यम स्पर्धा रविवारी सकाळी पार पडली. स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सादरीकरणापूर्वी एक तास विषय दिला जातो. त्या विषयावर आधारीत स्वत:ची नृत्यरचना करुन सादरीकरण केलं जातं. सादरीकरणाची रचना त्या कलाकारांची असणं बंधनकारक असतं. या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून 10 स्पर्धकांनी उपस्थिती दर्शवली होती. या स्पर्धेत 18-30 वर्षे वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. स्पर्धेला परीक्षक म्हणून लता रामन, नंदिनी कृष्णन, मेधा जोशी या भरतनाट्यम क्षेत्रातील दिग्गज कलावंतांनी उपस्थिती दर्शवली.

पुढील बातमी
इतर बातम्या