शिवाजी पार्कच्या मधली गल्ली कपडे दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज
01/7
शिवाजी पार्कच्या मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुपनं एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. रविवारी मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुप तर्फे डोनेशन ड्राइव्ह राबवण्यात आला. डोनेशन ड्राइव्ह अंतर्गत अनेकांनी घरातील जुने कपडे दान केले.
02/7
मधली गल्ली तर्फे आयोजित या ड्राईव्हमध्ये १४६ दानशूरांनी सहभाग नोंदवला होता.
03/7
नागरिकांनी आणलेले कपडे घेण्यासाठी मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुपचे सदस्य हजर होते. नागरिकांच्या पुढाकारानं आणि मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुपनं केलेल्या उपक्रमामुळे गरजूंना मदत होईल यात काही शंका नाही.
04/7
डोनेशन ड्राइव्ह तर्फे २६६ बॉक्स भरून कपडे जमा करण्यात आले. यामध्ये स्टेशनरी, बेडशिट आणि जखमी प्राण्यांसाठी कापसाचे बंडल्स देखील दान करण्यात आले होते.
05/7
दान करण्यात आलेले कपडे गुंज या संघटनेमार्फत पोडोचवल्या जातील. गुंज हे सामान गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करते.
06/7
आपल्याला आवश्यक नसलेल्या गोष्टी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवता आल्या तर...याच भावनेतून शिवाजी पार्कच्या मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुप अनेक उपक्रम राबवत असतं.
07/7
गूंज (goonj.org)हा भारतातल्या टॉप १० एनजीओजपैकी एक आहे. याचं प्रमुख केंद दिल्लीला आहे. गूंजची सुरूवातही १९९९ साली अंशू गुप्ता यांनी केली. या एनजीओतर्फे पूरग्रस्तांना मदत, मानवीय मदत आणि समाज विकासाचं कार्य केलं जातं.
पुढील बातमी
इतर बातम्या