तेजानं उजळली मुंबई!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात रविवारी देशाला पुन्हा एकदा एकत्र येण्याची विनंती केली. यावेळी, त्यांनी प्रत्येकाला ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करण्यास सांगितलं. आपण सामना करत असलेल्या कोरोनाव्हायरसच्या लढाईविरुद्ध एकत्र उभे राहण्यासाठी त्यांनी भारतीयांना मेणबत्त्या, पणत्या किंवा मशाल दिवे लावण्याचं आवाहन केलं.

मुंबईकरांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातील लाईट बंद करून दिवा, मेणबत्त्या लावल्या. मुंबईतील कित्येक भागात लाईट बंद करण्यात आली होती. लोकांनी घरात, बाल्कनीत, खिडक्यांमध्ये  दिवे, मेणबत्त्या लावून रोशनाई केली होती. दिवे, मेणबत्तीच्या प्रकाशात मुंबई उजळून निघाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ एप्रिल २०२० रोजी भारतभरातील सहभागास सामूहिक शक्ती म्हणून संबोधित केलं. ते म्हणाले की, ही एक मोठी लढाई आहे. एक राष्ट्र म्हणून आपण थकू नाही शकत. या समस्येचं निराकारण करणं हे आपलं ध्येय आहे. कोरोनाव्हायरस विरुद्ध लढ्यात आपण विजयी होऊ.

मुंबई लाइव्हनं आपल्या युझर्सना या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि सोशल मीडियाद्वारे व्हिज्युअल्स पाठवण्याचं आवाहन केलं होतं. आम्हाला या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. ९ बजे ९ मिनिट या टॅगलाईनअतर्गत आम्हाला बरेच व्हिडिओ आले. हेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


पुढील बातमी
इतर बातम्या