मुंबई पोलिसांना कार्टून नेटवर्कची साथ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आणि रोड सेफ्टीला प्राधान्य देत मुंबई पोलिसांनी एका आगळ्या-वेगळ्या कॅम्पेनला सुरुवात केली आहे. या कॅम्पेनमध्ये मुलांना त्यांच्या सुरक्षेबाबतच वाहतुकीच्या नियमांसंबंधात सांगण्यात येणार आहे. विशेष म्हणजे थेट मुलांपर्यंत पोचण्यासाठी लहान मुलांची वाहिनी असलेल्या कार्टून नेटवर्कने हे कॅम्पेन राबवण्यात पुढाकार घेतला असून दोन चित्रफितीचे देखील त्यांनी यावेळी अनावरण केले आहे.

मंगळवारी बालदिनाच्यानिमित्ताने या दोन्ही कॅम्पेनची मुंबई पोलिसांकडून सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्टून नेटवर्कने दोन व्हिडिओ देखील लाँच केले. ज्यात लहान मुलांचा आवडता "रोल नंबर २१" मधील क्रिस हा मुलांना वाहतुकीचे नियमांविषयी त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींशी कसे बोलावे याबद्दल चिमुरड्यांना सांगणार आहेत. मुंख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या कॅम्पेनला सुरुवात झाली.

बच्चे पुलीस बुलाएेंगे

वरळीच्या एमएससीआयमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात बच्चे पुलीस बुलाऐंगे या कॅम्पेनला देखील सुरुवात करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे १०० नंबर फिरवून थेट पोलिसांना बोलावून घेण्याची शिकावे. यावेळी लाहान मुलांना देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या तब्बल १५०० मुलांनी जबाबदार नागरिक बनण्याची शपथ घेतली.

लहान मुलांना एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली आहे. बच्चे पुलीस बुलाएंगे ही कॅम्पेन मुलांना सामाजिक नियम आणि बंधनाबाबत सजग तर केरेलच पण त्यांच्यात एक जबादारीची जाणीव देखील करेल. मेसेज थेट मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला कार्टून नेटवर्कसारखा एक उत्तम सहकारी मिळाला आहे.

- दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त

ट्रॅफिक गाईड प्रोजेक्टची देखील सुरुवात

मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकाराने ट्रॅफिक पोलीस गाईड नावाच्या प्रोजेक्टलादेखील सुरुवात करण्यात आली. यात सामान्य नागरीक हे वाहतूक पोलिसांसह मिळून वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील. या योजनेमध्ये आतापर्यंत तब्बल ५००० मुंबईकरांनी नाव नोंदणी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या