भाऊ दाजी लाड संग्रहालयात 'म्युझियम कट्टा'!

  • मुंबई लाइव्ह टीम & प्रविण वडनेरे
  • समाज

भाऊ दाजी लाड संग्रहालयातर्फे यंदा एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. कला, संस्कृती, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींविषयी जनमानसात जनजागृति व्हावी यासाठी 'म्युझियम कट्टा' या नावाचा उपक्रम भाऊ दाजी लाड संग्रहालयातर्फे राबवण्यात येत आहे.

काय आहे 'म्युझियम कट्टा'?

'म्युझियम कट्टा'मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित लघुपट किंवा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यंदा संशोधक, लेखिका आणि चित्रपट निर्मात्या अंजली किर्तने यांच्या लघुपटांचं सादरीकरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी स्वत: अंजली किर्तने उपस्थित राहणार असून त्याच लघुपटाविषयी प्रेक्षकांना माहिती देणार आहेत. विशेष म्हणजे, लघुपटाच्या सादरीकरणानंतर चर्चासत्रही आयोजित करण्यात आलं आहे.

कोणत्या लघुपटांचं सादरीकरण?

० गुरुवार, १२ एप्रिल २०१८ - संगीताचे सुवर्णयुग (१८५०-१९५०) (७० मिनिटं)

० गुरुवार, १० मे २०१८ - दुर्गा भागवत: एक शोध (७० मिनिटं)

० गुरुवार, १४ जुन २०१८ - डॉ. आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व (२० मिनिटं)

० गुरुवार, १२ जुलै २०१८ - गानयोगी: पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर (१३० मिनिटं)

दरम्यान, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. नोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://bit.ly/2GYW402

पुढील बातमी
इतर बातम्या