मुंबई ही स्वप्ननगरी आहे. या स्वप्न नगरीत छोटे का होईना पण स्वत:चे घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण सध्या मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. जे लोक आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत त्यांनाच मुंबईत घर घेणे परवडते. मात्र आता मुंबईत घर घेण्याचे चित्र बदलले आहे. मुंबईत जाती-धर्माच्या आधारे घरे विकली जात आहेत का? एका व्हायरल ट्विटमुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबईत एका मुस्लिम मुलीला घर घेण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बलराम विश्वकर्मा यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत सांगितले आहे.
विश्वकर्मा यांनी ट्विट केले की, गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या ओळखीची 20 वर्षांची मुस्लिम मुलगी मुंबईत घर शोधण्यासाठी धडपडत आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने मुस्लिम समुदायाबबात एक नाकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच कारणामुळे तिला अनेक ठिकाणी घर नाकारण्यात आले. रात्री झोप कशी येते? विश्वकर्मा यांनी हे ट्विट केले आणि @sudiptoSENTlm @VipulAlShah यांना टॅग केले.
मुंबईत केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही भाड्याने घर मिळण्यात अडचणी येत आहेत. जानेवारी 2023 मध्ये, मॉडेल Uorfi जावेदने देखील एका ट्विटद्वारे सांगितले होते की, ती मुंबईत घर शोधण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याआधी अभिनेता इमरान हाश्मीनेही ट्विट केले होते की, नवीन घर शोधताना समाज कंटकांनी धर्मामुळे त्रास दिला. तसेच टीव्ही अभिनेत्री शिरीन मिर्झा, अली गोनी यांनाही त्यांच्या धर्मामुळे घर नाकारण्यात आले आहे.
हेही वाचा