अखेर ट्रस्ट नमलं...

  • रेणुका गरकल & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

महालक्ष्मी - हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्टनं अखेर तयारी दाखवलीये. सुप्रीम कोर्टात ट्रस्टनं तसं आश्वासन दिलं आहे. यापूर्वी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेनं उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. ती मान्य करत हायकोर्टानं महिलांनाही दर्ग्यात तिथपर्यंत प्रवेश देण्याचे आदेश दिले होते, जिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे. मुंबई हायकोर्टानं हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील बंदी उठवली होती. 26 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई हायकोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला होता. मात्र हाजी अली ट्रस्टने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यावरील सुनावणीत ट्रस्टींनी महिलांना मजारपर्यंत प्रवेश देऊ असं सांगितलं. आता महिलांनाही मजारपर्यंत येता यावं म्हणून वेगळा रस्ता तयार करण्यात येईल, ज्याला दोन आठवडे लागतील, असं ट्रस्टचे वकील गोपाळ सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे या निर्णयाचं स्वागत करताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी हा भारताच्या घटनेचा विजय असल्याचं मत व्यक्त करतानाच अन्य धार्मिक स्थळंही हीच भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या