मुंबईत पेट्रोल १०५ रुपयांवर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

एकीकडं कोरोनामुळं राज्य सरकारनं लावलेले निर्बंध आणि दुसरीकडं वाढते पेट्रोल व डिझेलचे भाव यामुळं सर्वसामान्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या आर्थिक खर्चामुळं नागिरकांचा खिसा रिकामा होत आहे. मुंबईत बुधवारी एका लीटर पेट्रोलची किंमत तब्बल १०५ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर डिझेलही लवकरच शंभरी गाठेल, अशी चिन्हे दिसत आहेत. 

पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती सामान्यांसाठी चिंतेचे प्रमुख कारण ठरत आहेत. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल- डिझेलचा आजचा दर

  • मुंबई: पेट्रोल - १०४.९०, डिझेल ९६.७२
  • पुणे: पेट्रोल - १०४.४८, डिझेल ९४.८३
  • नाशिक: पेट्रोल - १०५.२४, डिझेल ९५.५६
  • औरंगाबाद: पेट्रोल - १०६.१४, डिझेल ९७.९६
  • कोल्हापूर: पेट्रोल - १०५.००, डिझेल ९५.३५


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या