मुंबईत पेट्रोलचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीचा सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. सद्यस्थितीत मुंबईत पेट्रोलचे भाव १०९.२५ रुपये असून डिझेलचे भाव ९९.५५ रुपये इतकी आहे. सरआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घसरण झाली असली तरी देशात आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांना आता अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

आयओसीएलच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी आणि डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.२४ रुपये आणि डिझेलची किंमत ९१.७७ रुपये झाली आहे. इतर महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

  • दिल्लीत पेट्रोलची किंमत १०३.२४ रुपये आहे, तर डिझेल ९१.७७ रुपये प्रति लीटर आहे. 
  • मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.२५ रुपये आहे, तर डिझेल ९९.५५ रुपये प्रति लीटर आहे. 
  • कोलकातामध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये आहे, तर डिझेल ९४.८८ रुपये प्रति लीटर आहे. 
  • चेन्नईमध्ये पेट्रोल १००.७५ रुपये आहे, तर डिझेल ९६.२६ रुपये प्रति लीटर आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या