प्ले आणि शाईन फाऊंडेशनची स्वच्छता मोहीम यशस्वी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

प्ले अँड शाइन फाऊंडेशनचे दूरदर्शी संस्थापक सार्थक वाणी यांंनी 1 ऑक्टोबर 2023 रोजी माहीम रेती बंदर बीच इथे मेगा बीच क्लीनअपचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम स्वच्छता ही सेवा या मोहिमेच्या संयोगाने धोरणात्मकरीत्या आयोजित करण्यात आला होता.

मेगा बीच क्लीनअप सकाळी 8:00 वाजता सुरू झाले होते. राजकीय नेते, ख्यातनाम व्यक्ती आणि समुदायाच्या प्रभावशाली नागरिकांनी याला पाठिंबा दर्शवला. चित्रा वाघ, प्रसिद्ध अभिनेते चिराग पाटील, पर्यावरणवादी विक्रांत आचरेकर, रितू तावडे, निखिल रुपारेल, आणि आदरणीय समाजसेविका सीमा सिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याव्यतिरिक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून विशेष कर्तव्य अधिकारी (OSD)  इरफान काझी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला पाठिंबा मिळाला. 

सार्थक वाणी यांनी उदंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, "स्वच्छता ही सेवा या मोहिमेत योगदान देण्यासाठी विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती एकत्र आले हे पाहून आनंद झाला. 

चित्रा वाघ म्हणाल्या की, "मेगा बीच क्लीनअपमध्ये सहभागी होणे म्हणजे केवळ समुद्रकिनारा स्वच्छ करणे नव्हे तर ही एक आपल्या भविष्यासाठीची चळवळ आहे. प्ले आणि शाइन फाऊंडेशनने राबवलेली ही मोहीम  प्रशंसनीय आहे.

चिराग पाटील म्हणाले की, "पर्यावरणासाठी योगदान देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्ले आणि शाइन फाउंडेशनने आयोजित केलेले मेगा बीच क्लीनअप ही या सामायिक जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या