ट्रॅव्हलिंग लायब्ररी! कधी ऐकलं आहात का?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

तुमच्या आसपास सर्वत्र फक्त पुस्तकं आहेत...तुम्हाला हवं ते पुस्तक काढून वाचायचं..त्यावर विचार करायचा...जमल्यास चर्चा करायची..आणि वाटलंच, तर ते पुस्तक विकत घ्यायचं! वाचनवेड्या प्रत्येकाचीच अशी काहीशी इच्छा असते. आपल्या वाचनात कोणताही खंड न पडता सलग वाचन करता येण्याची बऱ्याच जणांची इच्छा अपुरीच रहाते. पण आता ती इच्छा पूर्ण होणार आहे. किमान भारतातल्या काही शहरांमधल्या वाचनप्रेमींची तरी. ट्रॅव्हलिंग लायब्ररीच्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होणार आहे.

ट्रॅव्हलिंग लायब्ररी म्हणजे?

ट्रॅव्हलिंग लायब्ररी ही सिस्टर लायब्ररी या नावानं ओळखली जाते. सिस्टर लायब्ररी एक प्रवासी ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात महिला लेखकांनी लिहिलेली पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिला लेखकांच्या कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांनी दिलेलं साहित्य क्षेत्रातील योगदान सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

सिस्टर लायब्ररी ही एक्वी थमी यांच्या मार्फत चालवली जाते. एक्वी थमी यांच्या म्हणण्यानुसार"आत्तापर्यंत पुरुषांनी लिहिलेल्या साहित्याला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. पुरुषांच्या नजरेतून स्त्री कशी आहे? किंवा कशी हवी? याबद्दल खूप लिहिले गेले आहे. पण महिलांच्या दृष्टीकोनातून महिलांना समजून घेण्याचा पहिलाच प्रयत्न सिस्टर लायब्ररीच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. खरंतर हाच सिस्टर लायब्ररीराचा उद्देश आहे.”

६ शहरांमध्ये होणार ट्रॅव्हलिंग लायब्ररीचा प्रवास!

भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सिस्टर लायब्ररीतर्फे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली, कोचीन आणि बंगळुरु या ठिकाणी लवकरच पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मुंबईत कधी हे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार हे अजून निश्चित नाही. मात्र लवकरच त्यासंदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाअंतर्गत वेगवेगळ्या देशांमधल्या महिला लेखक आणि कलाकार यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या