मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या. यावेळी त्यांच्यावर टीकाही करण्यात आली.
त्याचं झालं असं की ख्रिसमसच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या एका चॅरिटेबल इव्हेंटमध्ये अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. नंतर कार्यक्रमातील फोटो ट्विटरवर शेअर करत 'बी-सांता कॅम्पेन'चं उद्घाटन, अशी पोस्ट त्यांनी टाकली. यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
दिवाळीला अशा प्रकारच्या इव्हेंटचं आयोजन का केलं जात नाही, फक्त ख्रिसमसलाच का? असा प्रश्न यावेळी नेटकऱ्यांनी विचारला.
यानंतर अमृता फडणवीस यांनीही ट्वीटकरत उत्तर दिलं.
'प्रेम आणि भावनेला कोणताच धर्म नसतो. तुमच्या आसपास असलेली फक्त सकारात्मक ऊर्जा घ्या आणि नकारात्मक उर्जेपासून लांब राहा. हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. मी सर्व सण-उत्सव साजरी करते. आपण या देशाचं प्रतिनिधीत्त्व करतो. यामुळे देशावरील प्रेम, मानवता आणि धर्मनिष्ठा कुठेही कमी होत नाही.