मुंबई मॅरेथॉन 2017

मुंबई - संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या 14 व्या मुंबई मॅरेथॉनला दिमाखात सुरुवात झाली. एकूण 42,000 स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. हाफ आणि फुल मॅरेथॉनला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली.

 

 

 

 

 

हाफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक जी.लक्ष्मणने, दुसरा क्रमांक सचिन पाटील आणि तिसरा क्रमांक दीपक कुंभारने पटकावला. तर महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक मोनिका अत्रे, दुसरा क्रमांक मिनाक्षी पाटील आणि तिसरा क्रमांक अनुराधा सिंगने पटकावला. तर पूर्ण आंतरराष्ट्रीय अॅथलिट्स मॅरेथॉनला राज्यपाल विद्यासागर राव यांनी हिरवा झेंडा दाखवला.

 

 

 

 

स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढावा म्हणून अभिनेता जॉन अब्राहमही उपस्थित होता. मॅरेथॉनसाठी अनेक मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध ठिकाणी आरोग्य केंद्रांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी मॅरेथॉनसाठी मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहचला होता.

 

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या