डिस्ट्रिक्ट अॅथलेटीक्स स्पर्धेत ७ विक्रमांची नोंद

रायन इंटरनॅशनल क्लबच्या राहुल कदम आणि विक्रोळीच्या उद्याचल संघातील शर्वरी परुळेकर या दोघांनी जिल्हा अॅथलेटीक्स स्पर्धेत चमकदार कामिगरी केली. इंडिया मास्टर अॅथलेटिक्सतर्फे आयोजित केलेल्या तिसऱ्या फाईव्ह डिस्ट्रिक्ट ओपन ट्रॅक आणि फिल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत ७ नवीन विक्रमाची देखील नोंद झाली आहे. चर्नीरोड येथील युनिव्हर्सिटी मैदानावर खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई येथून २ हजार ५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत कोणी नोंदवला विक्रम?

  • डिस्ट्रिक्ट अॅथलेटीक्स स्पर्धेत राहुलने १०० मीटर, २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. याचदरम्यान झालेल्या १८ वर्षांखालील मुलींमध्ये शर्वरीने वैयक्तिक गटात लाँग जंप, १०० मीटर आणि ट्रीपल जंपमध्ये ११.१७ ची नोंद करत विक्रम केला.
  • याच गटात झालेल्या गोळाफेक स्पर्धेत पुर्णा रावराणे हीने १५.३० ची नोंद करत विक्रम रचला. पुरुष गटात रोहित चव्हाण याने ट्रॅक आणि फिल्ड मास्टरमध्ये ६०.३१ आणि पवईच्या शाम सिंहने ५५.१० मिनिटांची नोंद करत विक्रम केला.
  • मुलांच्या २० वर्षांखालील गटात ट्रीपल जंप प्रकारात कृष्णा सिंग याने १४.५४ ची नोंद केली तर १८ वर्ष गटात उंच उडी प्रकारात राजवंत गुप्ता याने १.८५ इतकी नोंद केली. ३००० मीटर धावणी प्रकारात रोहीत मांडवकर याने ९.४८.८४ सेकंदाची वेळ नोंदवत हा विक्रम आपल्या नावे केला.
पुढील बातमी
इतर बातम्या