शालेय कबड्डी स्पर्धा

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

घाटकोपर - पंतनगर इथल्या शिवाजी शिक्षण संस्था, मल्टी-पर्पज टेक्निकल हायस्कूलच्या माध्यमिक वर्गाच्या 28 आणि 29 नोव्हेंबर दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शाळेतील मुले आणि मुलींच्या कबड्डीचे सामने घेण्यात आले. आठवीच्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या तीन तुकड्यात मुलं आणि मुलींमध्ये कबड्डीचे सामने घेतले गेले. यात मुलींच्या अंतिम सामन्यात आठवी ‘अ’ तुकडी 20 गुणांनी विजयी ठरलीय. तर आठवीच्या मुलांची ‘अ’ तुकडी 13 गुणांनी विजयी झाली. दुसरीकडे नववीच्या ‘ब’ आणि ‘ड’ तुकड्यात मुलांच्या कबड्डी सामन्यात ‘ब’ तुकडी 40 गुणांनी विजयी झाली.

पुढील बातमी
इतर बातम्या